PB ratio || Net Profit margin || Revenue in Marathi

PB ratio  Net Profit margin । Revenue  in Marathi


 

PB ratio । Net Profit margin । Revenue  Fundamental analysis । in marathi

पीबी रेशिओ । नेट प्रॉफिट मार्जिन  रेव्हेन्यू । मराठीमध्ये

        PB ratio , नेट प्रॉफिट मार्जिन आणि रेव्हेन्यू ग्रोथ हे फंडामेंटल ऍनालिसिस मध्ये महत्वाचे घटक आहेत. या तीनही घटकांचं विश्लेषण आपण पुढे सविस्तर बघू. जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर योग्य शेअर निवडण्यासाठी पुढील गोष्टींचा विचार नक्की करा.

Share Market Marathi Mahiti ।। Share Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। Share Market in Marathi

 

Price to book value,Net Profit margin,Revenue

PB ratio :-

        PB ratio म्हणजेच Price to book value ratio (प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशिओ),

          यामध्ये बुक व्हॅल्यू च्या तुलनेत शेअरची मार्केट प्राईस किती आहे हे पाहिलं जातं.

                   प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशिओ  = शेअर ची किंमत / बुक व्हॅल्यू पर शेअर

                           Price to book value ratio = Shares market price / book value per share

या  ठिकाणी बुक व्हॅल्यू  म्हणजे शेअर होल्डर्स ला प्रति शेअर किती इक्विटी येते याच प्रमाण आहे.

    मग,

                     बुक व्हॅल्यू प्रति शेअर = शेअर होल्डर्स ची इक्विटी / एकूण शेअर्स ची संख्या  

                     Book value per Share = Share holders equity / total number of shares 

शेअर ची बुक व्हॅल्यू जेवढी कमी तेवढा तो शेअर गुंतवणुकीसाठी योग्य समजला जातो. सर्वसाधारणपणे शेअर ची बुक व्हॅल्यू ३ पेक्षा कमी असेल तर तो शेअर गुंतवणुकीसाठी योग्य असतो.अर्थात जशी शेअर ची प्राईस कमी-जास्त होईल तशी PB ratio देखील कमी-जास्त होते.

 

 

उदाहरणार्थ:-

                   उदाहरणार्थ:-   MRF ltd  ची मार्च २०२२ ची शेअर होल्डर्स ची इक्विटी १४०३१.९० कोटी इतकी होती आणि मार्च २०२२ मध्ये एकूण शेअर्स ची संख्या ४२ लाख इतकी आहे.

तर,

   बुक व्हॅल्यू पर शेअर = शेअर होल्डर्स इक्विटी / एकूण शेअर्स ची संख्या

=१४०३१९००००००० / ४२०००००

=३३४०९.२८

MRF ltd. ची बुक व्हॅल्यू मार्च २०२२ मध्ये ३३४०९.२८ एवढी होती.

तसेच मार्च २०२२ मध्ये MRF ltd  च्या शेअर ची प्राईस ग्राफ नुसार ६८००० एवढी घेतली तर PB ratio किती येते ते पाहू,

  PB ratio = शेअरची मार्केट प्राईस / बुक व्हॅल्यू पर शेअर

=  ६८००० / ३३४०९.२८

=२.०३५

MRF ltd. च्या शेअर मार्च २०२२ ची PB ratio २.०३५ आहे.  म्हणजे हा शेअर  PB ratio च्या दृष्टीने गुंतवणुकी साठी योग्य आहे. कारण PB ratio पेक्षा कमी आहे.

याचा अर्थ समजा एखाद्या कंपनीचा PB ratio २ आहे म्हणजेच त्या कंपनीच्या शेअर्स ची किंमत प्रति शेअर इक्विटी च्या दुप्पट आहे. म्हणजे  PB ratio २ असलेल्या कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी प्रति शेअर इक्विटी च्या तुलनेत दुप्पट रक्कम मोजावी लागेल.

पण मुळातच काही सेक्टर्स चा PB ratio चा खूप वाढलेला आहे. ज्या कंपन्या सातत्याने चांगला काम करत आहेत त्यांचा PB ratio खूप हाय आहे.अशा वेळी गुंतवणुकीसाठी योग्य स्टॉक निवडताना कंपनीच्या PB ratio ची तुलना  सेक्टर PB ratio च्या शी केली जाते.

नेट प्रॉफिट मार्जिन  Net profit margin:-

               नेट प्रॉफिट मार्जिन कंपनीला एकूण उलाढाली मागे किती टक्के निव्वळ नफा झाला हे दर्शवते.

मग, 

                 नेट प्रॉफिट मार्जिन =नेट प्रॉफिट / रिव्हेन्यू *१००

                Net profit margin = Net profit /revenue*100                     

Net profit margin हे ७% पेक्षा जास्त असावं. Net profit margin जेवढा जास्त तेवढा तो शेअर गुंतवणुकी साठी योग्य समजला जातो. ५% पेक्षा कमी नेट Net profit margin लो समजले जाते.

उदाहरणार्थ:-

महिंद्रा अँड महिंद्रा लि. चा  २०२२ चा टोटल रिव्हेन्यू ५९५२१.८७ कोटी एवढा होता आणि नेट प्रॉफिट ४९३५.२२ एवढे होते.

मग,

नेट प्रॉफिट मार्जिन = नेट प्रॉफिट / टोटल रिव्हेन्यू *१००

=४९३५.२२ / ५९५२१.८७*१००

=८. २९ %

म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा लि. चं २०२२ चं Net profit margin ८.२९ आहे.

जर एखाद्या कंपनीचं Net profit margin ७% पेक्षा जास्त असेल आणि  मागच्या ३-४ वर्षांमध्ये कंपनीने Net profit margin मध्ये ७% पेक्षा जास्तीचं  सातत्य राखले असेल. तर असा स्टॉक Net profit margin च्या दृष्टीने योग्य समजला जातो.

       


रिव्हेन्यू अँड प्रॉफिट ग्रोथ
 । Revenue and Profit Growth:-

  • एखाद्या कंपनीचा रिव्हेन्यू आणि प्रॉफिट चा आलेख मागच्या काही वर्षात वाढता असेल तर असा शेअर गुंतवणुकी साठी योग्य समजला जातो.
  •   मागच्या काही वर्षात रिव्हेन्यू चा आलेख वाढता आहे पण त्या तुलनेत प्रॉफिट वाढलेलं नसेल तर असा शेअर गुंतवणुकी साठी योग्य समजला जात नाही.
  • एखाद्या कंपनीचा रिव्हेन्यू आणि प्रॉफिट चा आलेख मागच्या काही वर्षात घटता असेल किंवा त्यात सातत्य नसेल तरी असा शेअर गुंतवणुकी साठी योग्य समजला जात नाही.

तुम्हाला वरील माहिती कशी वाटली हे कंमेंट करून नक्की सांगा.

 

धन्यवाद.

 

Share Market Marathi Mahiti ।। Share Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। Share Market in Marathi


Leave a comment