Share Market Basics in Marathi


Share Market Basics in Marathi ।। शेअर मार्केट बेसिकस मराठीमध्ये 


Share Market Marathi Mahiti ।। Share Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। Share Market in Marathi

Share Market

१) Small Cap, Mid Cap,  Large Cap,  म्हणजे काय ?

    Share Market मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅपिटल म्हणजे बाजार भांडवलानुसार Small Cap, Mid Cap,  Large          Cap असे तीन भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. 

    Small Cap :- कंपनीची मार्केट कॅप ५००० कोटी पेक्षा कमी असेल तर तिला Small Cap कंपनी म्हणतात.

    Mid Cap:-  कंपनीची मार्केट कॅप ५००० कोटी ते २०००० कोटी च्या दरम्यान असेल तर तिला Mid Cap कंपनी      म्हणतात.

    Large Cap:- कंपनीची मार्केट कॅप २०००० कोटी पेक्षा जास्त असेल तर तिला Large Cap कंपनी म्हणतात.

२) Assets म्हणजे काय ?

     Assets म्हणजे मालमत्ता.

     ज्या साधनांचा वापर करून किंवा जी साधनं विकून कंपनीकडे पैसा येणार आहे त्या सर्व साधनांना कंपनीची           Assets म्हणतात. Assets चे दोन प्रकार पडतात. Tangible Assets आणि Intangible Assets

    Tangible Assets:- Tangible Assets म्हणजे स्थावर मालमत्ता. प्लांट्स, मशीन्स, इक्विपमेंट्स, रॉ मटेरियल या          Tangible Assets आहेत.

    Intangible Assets:- Intangible Assets  म्हणजे जंगम मालमत्ता. बॉण्ड्स, ट्रेडमार्क्स, लोगो, कॉम्पुटर                    सॉफ्टवेर, लायसेन्स, कॉपीराईट्स,पेटंट्स या Intangible Assets आहेत.

         पण कंपनी  Balance Sheet मध्ये Assets दाखवताना Current Assets आणि Non-current Assets या दोन        प्रकारात दाखवते.

    Current Assets:- Cash, Inventory, Receivable Payments(येणारे पैसे), Prepaid liabilities or                        expenses(वेळे आधी भरलेले व्याज किंवा टॅक्स), कमी काळासाठी केलेली गुंतवणूक या सर्व Current                     Assets आहेत.

     Non-current assets :-प्लांट्स, मशीन्स, इक्विपमेंट्स, कॉपीराईट्स, पेटंट्स, जास्त काळासाठी केलेली                 गुंतवणूक या सर्व Non-current Assets आहेत.


३) Inventory म्हणजे काय ?

    कंपनीमध्ये जो माल स्टॉक मध्ये आहे , जो माल प्रोसेसिंग मध्ये आहे तसेच ज्या मालाची प्रोसेसिंग पूर्ण झाली आहे      अशा सर्व मालाला Inventory  म्हणतात. 

४) Equity म्हणजे काय ?

    कंपनीचे कर्ज वजा केल्यानंतर उर्वरित अससेट्स च्या एकूण बाजार मूल्याला इक्विटी म्हणतात. 

         Equity = Assets – Liabilities 

५) Liquidity म्हणजे काय ?

    कंपनी आपल्याकडील Assets चे किती सहजतेने शेअर्स च्या मार्केट प्राईस वर पारिणाम न करता रोख रकमेत        रूपांतर करू शकते याला Liquidity  म्हणतात. 

        Cash, Bonds, Stocks, Mutual Funds, Certificate of deposit या Liquid assets आहेत. या विकून कंपनी      जलद निधी उभा करू शकते.

६) Bonds म्हणजे काय ?

     कंपनी गुंतवणूकदारांकडून कर्ज घेते त्याला Bonds म्हणतात. हे Bonds गुंतवणूकदार दुसऱ्या गुंतवणूकदाराला       विकू शकतो. Bonds खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदाराला कंपनी भांडवलाच्या बदल्यात व्याज देते. 

७) Dividend Yield म्हणजे काय ?

     कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना करंट शेअर च्या किमतीच्या तुलनेत प्रति शेअर किती टक्के डिविडेंड             दिला यालाच Dividend Yield म्हणतात. 

     Dividend Yield = Dividend per share / Current Share Price * 100

८) Sensex काय आहे ?

   SENSEX हा शब्द Sensitive आणि Index या दोन शब्द पासून बनला आहे. Sensex हा  BSE चा निर्देशांक           आहे ज्यामध्ये  BSE वर सर्वात जास्त सक्रियपणे ट्रेड होणाऱ्या ३० सर्वात मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. 

९) NIFTY काय आहे ?

          NIFTY  हा शब्द National आणि Fifty या दोन शब्द पासून बनला आहे. NIFTY हा NSE चा निर्देशांक         आहे. ज्यामध्ये  NSE वर सर्वात जास्त सक्रियपणे ट्रेड होणाऱ्या ५० सर्वात मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.


१०) SEBI काय आहे ?

      SEBI म्हणजे Securities Exchange Board Of India. SEBI भारतातील शेअर बाजारावर देखरेख करणारी,          नियमन करणारी संस्था असून ती गुंतवणूदार आणि ट्रेडर्स च्या हिताचे रक्षण करते. कंपनी आणि ब्रोकर्स कडून        गुंतवणूकदारांना अचूक माहिती दिली जातेय की नाही याची खात्री करते तसेच शेअर बाजार सुरळीत                      चालण्यासाठी कंपनी, गुंतवणूकदार, आणि ब्रोकर्स साठी नियम बनवते. 

११) Demat Account चा काय उपयोग आहे ?

      शेअर मार्केट मध्ये बॉण्ड्स, सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स ची खरेदी विक्री करण्यासाठी डिमॅट        अकाउंट असणे गरजेचे असते. डिमॅट अकाउंट च्या माध्यमातून सामान्य गुंतवणूकदार शेअर्स खरेदी विक्री              करू शकतो. मार्केट मध्ये अनेक चांगले ब्रोकर्स आहेत ज्यांच्याकडे आपण डिमॅट अकाउंट खोलू शकतो. 

१२) Demat Account खोलण्यासाठी कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत ?

       Demat Account खोलण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत,

  • पॅन कार्ड 
  • आय डी प्रूफ (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स,पासपोर्ट, वोटर आय डी यापैकी कुठलेही एक )
  • ऍड्रेस प्रूफ (आधार कार्ड, पासपोर्ट, वोटर आय डी यापैकी कुठलेही एक)
  • इन्कम प्रूफ(६ महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट )
  • बँक अकाउंट प्रूफ(कॅन्सल चेक)
  • १ पासपोर्ट साईझ फोटोग्राफ

    

हेही वाचा शेअर मार्केट प्रश्न-उत्तरे ।। Share Market questions and answers

     वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करिन नक्की सांगा. 

     धन्यवाद. 

Share Market Marathi Mahiti ।। Share Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। Share Market in Marathi


Leave a comment