ITC ही भारतीय शेअर मार्केट मधील ४ लाख कोटींची अवाढव्य मार्केट कॅप असलेली एक लार्ज कॅप कंपनी आहे. मार्केट कॅप च्या दृष्टीने ITC ही भारतातील ११ व्या क्रमांकाची कंपनी आहे. ITC Ltd. हा विविध व्यवसायांचा ग्रुप आहे. यामध्ये FMCG, हॉटेल्स, पेपर बोर्ड्स, पॅकेजिंग, कृषी उत्पादने आणि माहिती तंत्रज्ञान इत्यादी व्यवसायांचा समावेश आहे.
ITC Overview and Products, Revenue in Marathi
ITC product wise revenue in Marathi ।। ITC ।। ITC Ltd ।। ITC Company ।। ITC Products
Share Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। Share Market in Marathi
संजीव पुरी हे ITC Ltd. चे चेअरमन आणि MD आहेत. त्यांच्या लीडरशिप मध्ये कंपनी चांगली आर्थिक प्रगती करत आहे. तसेच २०३० पर्यंत ITC ची उलाढाल १ लाख कोटी पर्यंत नेण्याचा संजीव पुरी यांचं ध्येय आहे.
मागच्या १० वर्षां मध्ये कंपनीचा रिव्हेन्यू १०३ % नि वाढला आहे तसेच नेट प्रॉफिट हे १४४ % नि वाढलं आहे.
अगदी कोविड१९ च्या काळातही ITC ने चांगला व्यवसाय केला आहे. कंपनीने FY २०२० साली 52010.16 कोटी तसेच FY२०२१ साली 51905.34 कोटी चा व्यवसाय केला. कंपनीचे मागचे ५ वर्षाचे सरासरी मार्जिन २५.७४% आहे.
ITC कंपनीचा FY२०२२ चा रिव्हेन्यू ६२५२१.९२ कोटी आहे. मागच्या ५ वर्षांचा विचार केल्यास कंपनीच्या रिव्हेन्यू मध्ये दरवर्षी सरासरी ७.२६% ची वाढ होऊन कंपनीचा मार्केट शेअर दरवर्षी वाढत आहे.
ITC चा FY२०२२ चा नेट प्रॉफिट १५२४२.६६ असून त्यामध्ये दरवर्षी सरासरी ८.९२% ची वाढ होत आहे.कंपनीचे FY२०२२ चे मर्जिंन २४.३८% आहे.
ITC कंपनीचा मागचा आर्थिक इतिहास बघता ITC भविष्यात आणखी दमदार कामगिरी करू शकते. आणि आपल्या शेअर होल्डर्स ना उत्तम परतावा मिळवून देऊ शकते. सध्या ITC च्या शेअर ची किंमत ३३५ रु. वर खेळत असून गेल्या एक वर्षात या शेअर ने ५० % पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. तसेच मागच्या १० वर्षात या शेअर ने जवळपास १२२ % चा रिटर्न दिला आहे.
ITC चा चा करंट PE ratio २७.३८ असून PB ratio ६.८ आहे. कंपनीचा Debt to Equity ratio ० आहे. म्हणजेच कंपनीवर कुठलेही कर्ज नाही.
ITC कंपनीचे डिविडेंड यील्ड ३.४ असून कंपनीने २०२१ साली १०.७५ रुपये डिविडेंड दिला आणि २०२२ साली ११.५० रुपये डिविडेंड दिला आहे.
ITC Ltd. च्या उत्पादनांचा रिव्हेन्यू मधील वाटा : ITC product wise revenue:-
सिगारेट्स :-ITC Ltd. च्या रिव्हेन्यू मध्ये सिगारेट चा वाटा ३६ % आहे. कधीकाळी सिगारेट आणि टोबॅको हे ITC Ltd चे मुख्य प्रॉडक्ट होते. पण आता ITC Ltd. ने बाकीची उत्पादने वाढवल्याने सिगारेट चा वाटा कमी झाला आहे.
इतर FMCG:– ITC Ltd. च्या रिव्हेन्यू मध्ये २४.७७ % वाटा हा इतर FMCG उत्पादनांचा आहे.
Agri Products:- २५.०८ % वाटा कृषी उत्पादनांचा आहे.
पेपरबोर्ड आणि पॅकेजिंग:- पेपरबोर्ड आणि पॅकेजिंग उत्पादनांचा ११.८३ % वाटा आहे.
हॉटेल्स:-
१.९९ % वाटा हा हॉटेल्स व्यवसायाचा आहे.
ITC च्या रिव्हेन्यू मध्ये हॉटेल्स चा वाटा जरी कमी वाटत असला तरी जवळपास ७० लोकेशन्स वर एकूण ११३ पेक्षा जास्त हॉटेल्स ITC चालवते.
ITC ची उत्पादने:-
आशिर्वाद आटा, सनफिस्ट बिस्किट्स, बिंगो मॅड अँगल, यीप्पी न्युडल्स, मिंट-ओ , कॅण्डीमॅन, क्लासमेट बुक्स, क्लासमेट पेन , विवेल सोप, सॅवलॉन ही कंपनीची काही प्रसिद्ध उत्पादने आहेत.